iPhone वरील ‘आरोग्य’ डेटाची प्रस्तावना
आरोग्य ॲप iPhone, iPad आणि Apple Watch, तसेच सुसंगत थर्ड पार्टी ॲप आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसमधील तुमची आरोग्य माहिती सुरक्षितपणे संग्रहित करते. तुम्ही शरीराची मोजमापे, लक्षणे, ऋतुचक्राची माहिती आणि बऱ्याच माहितीसाठी देखील मॅन्युअली डेटा प्रविष्ट करू शकता.
Siri : सपोर्ट असलेल्या मॉडेल्सवर, “What’s my heart rate?” किंवा “How far have I walked today?” असे काहीतरी Siri ला सांगा (सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही). Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

iPhone मधील आरोग्य डेटा
iPhone मौल्यवान आरोग्य डेटा ऑटोमॅटिकली संग्रहित आणि विश्लेषित करते, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे :
पावले, जिन्याच्या पायऱ्या, आणि इतर वॉकिंग डेटा : तुमच्या iPhone वरील बिल्ट इन सेन्सरवर तुम्ही चाललेल्या पावलांची संख्या, तुम्ही चढणाऱ्या पायऱ्यांची संख्या, तुमच्या चालण्याचा वेग आणि बरेच काही कॅप्चर करा. तुम्ही ‘आरोग्य’ मधील ‘ॲक्टिव्हिटी’ श्रेणीमध्ये ह्या डेटाविषयी हायलाइट, ट्रेंड आणि तपशील ब्राउझ करू शकता.
गतिशीलता डेटा : iPhone चालण्यातील विषमता, दुप्पट समर्थन कालावधी आणि ह्यासारखे बरेच महत्त्वाचे गतिशीलता मेट्रिक्स संग्रहित करतो. कालांतराने, जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात iPhone ठेवून चालता किंवा तो तुमच्या कंबरेजवळ परिधान करता, तेव्हा ह्या मेट्रिक्सचा वापर तुमच्या चालण्याच्या स्थिरतेची गणना आणि नोंद करण्यासाठी केला जातो. तुम्ही ‘गतिशीलता’ श्रेणीमध्ये हा डेटा ब्राउझ करू शकता. जर तुमची स्थिरता इतकी कमी झाली की पुढील 12 महिन्यांत तुम्ही पडण्याचा धोका वाढू शकतो, तर तुम्ही नोटिफिकेशन प्राप्त करू शकता आणि इतरांबरोबर तुमचे नोटिफिकेशन शेअर करू शकता.
हेडफोन ऑडिओ पातळी : कनेक्ट केलेले AirPods, EarPods किंवा इतर सुसंगत हेडफोनमधील ऑडिओ पातळीची मोजमापे ’आरोग्य’ मध्ये ऑटोमॅटिकली संग्रहित केली जातात. तुमच्या हेडफोन ऐकण्याच्या सवयी समजून घेण्यात मदत करण्यासाठी तुम्ही हा डेटा ‘श्रवण’ श्रेणीमध्ये रिव्ह्यू करू शकता.
झोपेची हिस्ट्री : जर तुम्ही ’आरोग्य’ मध्ये झोपेचे शेड्यूल सेट अप केले, तर iPhone तुम्ही झोपेच्या उद्देशाने अंथरूणावर पडलेल्या कालावधीचा अंदाज लावतो. तुम्ही तुमची झोपेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी झोपेच्या श्रेणीमध्ये हा डेटा रिव्ह्यू करू शकता.
तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याकडील आरोग्य नोंदी : तुम्ही सपोर्ट करणाऱ्या आरोग्य सेवा संस्थांकडून (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही) तुमच्या ॲलर्जी, वैद्यकीय स्थिती, औषधे आणि इतर अनेक आरोग्य नोंदींचे ऑटोमॅटिक डाउनलोड सेट अप करू शकता. तुम्ही ’आरोग्य’ मध्ये ह्या नोंदी ब्राउझ करू शकता.
Apple Watch मधील आरोग्य डेटा
तुमच्या Apple Watch सह iPhone पेअर केल्यानंतर, ठराविक कालावधीने हृदयाचे ठोके आणि रक्तातील ऑक्सिजनची मोजमापे Apple Watch वरून ‘आरोग्य’ ला ऑटोमॅटिकली पाठवली जातात, जिथे तुम्ही ‘हृदय आणि श्वसन’ श्रेणीमध्ये हायलाइट, ट्रेंड आणि तपशील ब्राउझ करू शकता. तुम्ही ’आरोग्य’ ला अतिरिक्त माहिती पाठवण्यासाठी Apple Watch देखील सेट अप करू शकता, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे :
व्यायामाची मिनिटे आणि इतर ॲक्टिव्हिटी मेट्रिक्स : तुम्ही iPhone वर ‘आरोग्य’ मधील ‘ॲक्टिव्हिटी’ श्रेणीमध्ये हे मेट्रिक्स बघू शकता.
सूर्यप्रकाशात घालवलेल्या वेळेची हिस्ट्री (Apple Watch SE दुसरे जनरेशन, Apple Watch Series 6 किंवा नंतरचे व्हर्जन आणि सर्व Apple Watch अल्ट्रा मॉडेल): Apple Watch मधील सभोवतालचे लाइट सेन्सर, तुम्ही सूर्यप्रकाशात किती वेळ घालवला ह्याचा अंदाज लावेल. तुम्ही iPhone वर ‘आरोग्य’ मधील ‘इतर डेटा श्रेणी’ मध्ये तपशील बघू शकता.
हृदयाचे उच्च किंवा निम्न ठोके, हृदयाची कमी तंदुरुस्ती (watchOS 7.2 किंवा नंतरचे व्हर्जन) आणि हृदयाची अनियमित लय (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही) ह्याविषयी नोटीफिकेशन : तुम्ही ‘हृदय’ श्रेणीमध्ये ह्या नोटिफिकेशनविषयी तपशील बघू शकता.
वातावरणातील गोंगाटाची पातळी आणि मोठ्या ध्वनीसंबंधी नोटिफिकेशन : तुम्ही ‘श्रवण’ श्रेणीमध्ये तुमच्या वातावरणातील गोंगाटाविषयी तपशील बघू शकता.
‘जीवनावश्यक’ ॲपमध्ये रात्रभराच्या आरोग्य मेट्रिक्स : तुमच्या दैनंदिन आरोग्याची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी—तुम्ही हृदयाची गती, श्वासोच्छवासाचा दर, मनगटाचे तापमान, रक्तातील ऑक्सिजन आणि झोपेचा कालावधी—असे रात्रभराचे आरोग्यविषयक मेट्रिक्स पाहू शकता. जर तुम्ही अनेक रात्री झोपताना तुमचे Apple Watch घातले, तर ‘जीवनावश्यक’ ॲप तुमच्या प्रत्येक आरोग्य मेट्रिक्ससाठी विशिष्ट मर्यादा स्थापित करते. जर अनेक मेट्रिक्स तुमच्या विशिष्ट मर्यादेच्या बाहेर असतील, तर तुम्हाला संदर्भासह औषधे किंवा आजार ह्यासारख्या संबंधित घटकांसाठी नोटिफिकेशन प्राप्त होईल. तुम्ही ‘जीवनावश्यक’ श्रेणीमध्ये तुमच्या रात्रभराच्या जीवनावश्यक गोष्टींविषयी तपशील बघू शकता.
जोरात पडण्याची हिस्ट्री ( Apple Watch SE आणि Apple Watch Series 4 आणि नंतरचे व्हर्जन): ‘इतर डेटा श्रेणी’ मध्ये, तुम्ही किती वेळा पडलात त्याबद्दल तपशील बघू शकता.
‘स्लीप’ ॲपमधील स्लीप स्कोअर : तुम्ही स्लीप स्कोअर पाहू शकता—तुम्ही किती वेळ झोपलात, तुमच्या अलीकडील इतिहासाच्या तुलनेत तुम्ही कधी झोपलात यातील सातत्य आणि झोपेदरम्यान जागृत राहण्याचे प्रमाण आणि कालावधी ह्याच्या अंदाजानुसार दिला जाणारा स्कोअर. तुम्ही उठल्यानंतर सुमारे 15 मिनिटांनी तुमचा स्लीप स्कोअर दिसतो. तुम्ही आदल्या रात्री घेतलेली झोप, झोपेच्या प्रत्येक स्टेजमध्ये घालवलेला वेळ आणि गेल्या 14 दिवसांतील तुमची झोपेची सरासरी देखील बघू शकता. तुम्ही ‘स्लीप’ श्रेणीमध्ये तुमच्या स्लीप स्कोअरबद्दल तपशील बघू शकता.
संभाव्य उच्च रक्तदाबाच्या नोटिफिकेशन्स (Apple Watch Series 9, Apple Watch Ultra 2 आणि नंतरचे व्हर्जन) : तुम्ही तुमच्या हृदयाच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी Apple Watch घालू शकता, ज्याचा वापर संभाव्य उच्च रक्तदाबाची चिन्हे ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमच्या Apple Watch ने उच्च रक्तदाबाचे पॅटर्न्स ओळखल्यास, तुम्हाला तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याशी ह्याबद्दल चर्चा करण्यासाठी नोटिफिकेशन प्राप्त होते. तुम्हाला 7 दिवसांच्या कालावधीत माप घेण्यासाठी थर्ड पार्टी ब्लड प्रेशर कफ वापरण्यास देखील सांगितले जाते. तुम्ही ‘हृदय’ श्रेणीमध्ये तुम्ही उच्च रक्तदाब नोटिफिकेशन्सविषयी तपशील बघू शकता.
Apple Watch वरील आरोग्य डेटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Apple Watch यूझर गाइडमध्ये आरोग्य फीचर्ससह सुरुवात करा, सूर्यप्रकाशात घालवलेला वेळ, गोंगाट पातळ्या मोजा, तुमच्या जीवनावश्यक गोष्टींचा मागोवा घ्या, ’पडत असल्याचे ओळखणे’ मॅनेज करा, तुमचा स्लीप स्कोअर आणि स्लीप हिस्ट्री बघा आणि उच्च रक्तदाबाच्या नोटिफिकेशन्स प्राप्त करा पहा.
इतर ॲप आणि डिव्हाइसवरील आरोग्य डेटा
तुम्ही App Store मधून डाउनलोड केलेले आरोग्य आणि फिटनेस ॲप सेट अप करत असताना, त्यांच्या ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करून त्यांना ‘आरोग्य’ सह डेटा शेअर करण्याची अनुमती द्या.
रक्तदाब मॉनिटर आणि वजनमापक सारख्या डिव्हाइसमधून डेटा संग्रहित करण्यासाठी, त्यांच्या सेटअप सूचनांचे पालन करा. Bluetooth® डिव्हाइसेसला iPhone सह पेअर करणे गरजेचे आहे.
नोट : तुम्ही कोणत्याही वेळी ॲप्स आणि डिव्हाइसेससाठी आरोग्य डेटा परवानग्या बदलू शकता.
तुम्ही मॅन्युअली समाविष्ट केलेला डेटा
तुम्ही तुमचे ऋतुचक्र, औषधे, शरीराची मोजमापे ह्याबद्दलचा आणि बराच डेटा मॅन्युअली प्रविष्ट करू शकता.
तुमच्या ऋतुचक्राची माहिती समाविष्ट करा : ऋतुचक्राची माहिती लॉग करून, तुम्ही मासिक पाळी आणि ‘गर्भधारणेसाठी योग्य काळ’ ह्याबद्दलचे अंदाज मिळवू शकता. ’आरोग्य’ मध्ये ऋतुचक्राची माहिती लॉग करा पहा.
तुमची औषधे, जीवनसत्त्वे, आणि पूरके समाविष्ट करा : हे आयटम समाविष्ट केल्याने, तुम्ही त्यांना घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रिमाइंडर प्राप्त करू शकता. ’आरोग्य’ मध्ये तुमच्या औषधांचा मागोवा घ्या पहा.
झोपेचे शेड्यूल सेट करा : झोपण्याच्या आणि उठण्याच्या नियमित वेळा शेड्यूल केल्याने तुम्हाला तुमची झोपेची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत होऊ शकते. ’आरोग्य’ मध्ये ‘स्लीप फोकस’ शेड्यूल सेट अप करा पहा.
वैद्यकीय ID मध्ये माहिती समाविष्ट करा : तुम्ही तुमच्या वैद्यकीय स्थिती, औषधे, आपत्कालीन संपर्क आणि इतर गोष्टींविषयीची माहिती आपत्कालीन वैद्यकीय ID मध्ये प्रदान करू शकता. तुमचा iPhone लॉक केलेला असतानाही, प्रथम प्रतिसादकर्ते आणि इतर लोक ही महत्त्वपूर्ण माहिती थेट तुमच्या iPhone वर बघू शकतात. तुमचा वैद्यकीय ID सेट अप करणे आणि बघणे पहा.
इतर ‘आरोग्य’ श्रेणींमध्ये माहिती समाविष्ट करा : ‘आरोग्य’ ॲपच्या तळाशी उजवीकडे
वर टॅप करा, श्रेणीवर टॅप करा, तुम्हाला अपडेट करायचा असलेल्या डेटासाठी
वर टॅप करा, नंतर वरच्या उजव्या बाजूला ’डेटा समाविष्ट करा’ वर टॅप करा.
महत्त्वाचे : iPhone, iPad आणि Apple Watch हे वैद्यकीय डिव्हाइसेस नाहीत. iPhone साठी महत्त्वाची सुरक्षा माहिती पहा.